कोल्हापूर न्यूज बुलेटिन | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

2021-04-28 786

शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे बाजारपेठेच्या प्रमुख ठिकाणी रात्री अज्ञात शिवभक्तांनी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली.

बांधकाम कामगारांना कोरोना मदत म्हणून पंचविस हजार रुपये तात्काळ मिळावेत यासह अन्य मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीतर्फे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर आज एल्गार मोर्चा काढण्यात आला.

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कामगार सुधारणा विधेयकांचा राज्य गुणवंत कामगार असोसिएशनतर्फे आज निषेध करण्यात आला.

कोरोनाच्या काळात लोकांवर वेळीच योग्य उपचार व्हावेत यासाठी व्हाईट आर्मीने पुढाकार घेतला.

गेल्या दोन दिवसांपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह येणाऱ्या पावसाने आज विश्रांती घेतली.

मुख्य बातमीदार : निवास चौगुले

व्हिडिओ : बी डी चेचर

Videos similaires